सिरोंचा बाजारात चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:20 AM2019-08-09T00:20:23+5:302019-08-09T00:20:50+5:30

दर सोमवारी सिरोंचा येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेते कमालीचे त्रस्त झाले आहेत. बाजाराच्या माध्यमातून नगर पंचायतीला उत्पन्न प्राप्त होते. यातील काही उत्पन्न खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण व ओट्यांची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

Mud empire at the market of ends | सिरोंचा बाजारात चिखलाचे साम्राज्य

सिरोंचा बाजारात चिखलाचे साम्राज्य

Next
ठळक मुद्देविक्रेते व ग्राहक त्रस्त : विक्रेत्यांसाठी ओटे बांधण्याची होत आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : दर सोमवारी सिरोंचा येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेते कमालीचे त्रस्त झाले आहेत. बाजाराच्या माध्यमातून नगर पंचायतीला उत्पन्न प्राप्त होते. यातील काही उत्पन्न खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण व ओट्यांची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.
सिरोंचा हे तालुकास्थळ असण्याबरोबरच मध्यवर्ती ठिकाण आहे. भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दर सोमवारी ग्रामीण व दुर्गम भागातून शेकडो नागरिक सिरोंचा येथे येतात. नगर पंचायतीने मात्र आठवडी बाजारात कोणत्याच सुविधा निर्माण करून दिल्या नाहीत. एका मोकळ्या जागेवर आठवडी बाजार भरते. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होते. भाजीपाला विक्रेते ताडपत्री जमिनीवर अंथरून भाजीपाला विकतात. पाऊस सुरू राहिल्यास पावसाचे पाणी ताडपत्रीमधून शिरते. परिणामी भाजीविक्रेत्यांना ओले व्हावे लागते व भाजीपाला सुद्धा खराब होतो. बाजारासाठी जागा कमी असल्याने कमी जागेत विक्रेत्यांना बसावे लागते. मार्ग अरूंद असल्याने ग्राहकांचीही मोठी गर्दी होते. मागील १५ दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात पाऊस हजेरी लावत आहे. पावसामुळे आठवडी बाजारात चिखल निर्माण होत असल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. काही ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने पाण्याचे डबके निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत असताना ओटे निर्माण करण्यात आले होते. मात्र सदर ओटे अल्पायुशी ठरले. काही वर्षातच ओटे फुटले. आता संपूर्ण जागा सपाट झाली आहे. नगर पंचायतीने मात्र ओटे निर्मितीविषयी कोणतेही पावले उचली नाहीत. परिणामी भाजी विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजार परिसरात डुकरांचा त्रास वाढला आहे. मोकाट जनावरांमुळे ग्राहक व विक्रेते सुद्धा कमालीचे त्रस्त झाले आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण करून ओट्यांची निर्मिती करावी, यासाठी अनेक वेळा नगर पंचायतीकडे पाठपुरावा केला. मात्र नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. आठवडी बाजार परिसरात घाण पसरली राहते. यामुळे बाजुला वस्तीदार असलेले नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठवडी बाजाराच्या दुसºयाच दुवशी येथील घाण साफ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

काँक्रिटीकरण आवश्यक
आठवडी बाजाराच्या माध्यमातून नगर पंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे या उत्पन्नापैकी काही भाग सोयीसुविधा निर्माण करण्यावर खर्च करण्यास काहीच हरकत नाही. चिखलाची समस्या कायमची दूर करायची असेल तर सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Mud empire at the market of ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.