कुनघाडा बाजारपेठ वस्तीत चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:25+5:302021-06-16T04:48:25+5:30
कुनघाडा रै. गावापासून १ किमी अंतरावर बाजारपेठ टोली आहे. या वस्तीची लोकसंख्या अडीच हजारांच्या घरात आहे. याच भागात प्राथमिक ...
कुनघाडा रै. गावापासून १ किमी अंतरावर बाजारपेठ टोली आहे. या वस्तीची लोकसंख्या अडीच हजारांच्या घरात आहे. याच भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळा, वनपरिक्षेत्र कार्यालय, तसेच नव्याने बांधण्यात आलेली महसूल भवनाची इमारत आहे. या भागात सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून नाली बांधकाम करण्यात आले आहे. नाल्या उंच झालेल्या असून रस्त्यावर पडलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट होत नाही त्यामुळे खोलगट भागात पाण्याचे डबके तयार झाले आहेत. याच डबक्यातून नागरिक आवागमन करीत असतात, तसेच संजय कुकडे व हिराचंद सुरजागडे यांच्या घराशेजारी रस्त्याआड चिखल आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या कच्च्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अरुण कुनघाडकर, हिराचंद सुरजागडे, संजय कुकडे, तेजराम टेकाम, वनिता बारसागडे, सविता कुनघाडकर, कुसुम कुनघाडकर, मंगला सुरजागडे, तुकाराम टेकाम यांनी केली आहे.
===Photopath===
130621\324851531534-img-20210613-wa0112.jpg
===Caption===
बाजारपेठ टोली वर चिखल झाल्याने मुरूम टाकण्याची नागरिकांची मागणी फोटो