चामोशीतील नळांना गढूळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:26 AM2021-07-15T04:26:05+5:302021-07-15T04:26:05+5:30
वैनगंगा नदीच्या लोंढोली घाटावर पाणी साठवणूक करणारी मोठी पाण्याची टाकी आहे. या टाकीतून मार्कंडादेव मार्गावरील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध ...
वैनगंगा नदीच्या लोंढोली घाटावर पाणी साठवणूक करणारी मोठी पाण्याची टाकी आहे. या टाकीतून मार्कंडादेव मार्गावरील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. त्यानंतर शहरातील जलकुंभात पाणी भरून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाऊस पडत असल्याने नदीतून गढूळ पाणी वाहत आहे. त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणाच बिघडल्यामुळे अशुद्ध पाण्याचाच पुरवठा नळाद्वारे सुरू आहे. या गढूळ पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नगरपंचायत प्रशासनाने बेड यंत्राची दुरुस्ती तातडीने करून चामोर्शीकरांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना विचारले असता, बिघाड झालेले यंत्र बदलून संपूर्ण शहराला लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.
140721\img-20210714-wa0146.jpg
चामोशी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे फोटो