केहकपारीत तयार केला बहूद्देशीय तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:24 AM2021-06-23T04:24:01+5:302021-06-23T04:24:01+5:30
पोलीस मदत केंद्र ताडगाव यांच्या ग्रामभेट अभियानादरम्यान पोलीस पथकाने छत्तीसगड सीमेलगत असलेल्या केहकापरी गावास भेट दिली. ग्रामभेटीमध्ये ग्रामस्थांच्या ...
पोलीस मदत केंद्र ताडगाव यांच्या ग्रामभेट अभियानादरम्यान पोलीस पथकाने छत्तीसगड सीमेलगत असलेल्या केहकापरी गावास भेट दिली. ग्रामभेटीमध्ये ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तेव्हा केहकापरी ग्रामस्थांनी त्यांच्या गाव परिसरात पाऊस चांगल्या प्रमाणात होतो. परंतु पावसाचे सर्व पाणी नदी-नाल्यावाटे वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, असे सांगितले. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून त्यांच्या गावाशेजारी एखादा बंधारा बांधल्यास पाणी टंचाईची गंभीर समस्या दूर होईल, असे ग्रामस्थांनी सांगीतले. त्यानंतर ग्रामभेटीस उपस्थित असलेले पोलीस मदत केंद्र ताडगावचे प्रभारी पोउपनि प्रेमशाहा सयाम, पोउपनि मनोहर वांढे, पोउपनि मनोज अहिरे, सीआरपीएफचे पी. आय. जाट यांनी पोकलेन व ट्रॅक्टर यांची जमवाजमव करून ग्रामभेटीनंतर त्याच दिवशी १९ जून राेजी गावाशेजारी बहूद्देशीय तलावाचे काम चालू केले. सदरचे काम २० जून राेजी पूर्ण केले. या कामात गावातील लहानांपासून तरुणांपर्यंत तसेच गिल्लू कुंजामी (८५), रघुनाथ चालखी (८५), समरू हेमला यांच्यासारख्या वयोवृद्धांनी हिरिरीने सहभाग घेतला. सदरच्या बहूद्देशीय तलावाकरिता प्रभारी अधिकारी सौरभ पिंगळे यांनी विशेष असे परिश्रम घेतले. बहूउद्देशीय तलावाचे काम पूर्ण झाल्याने गावकऱ्यांना त्यांच्या जनावरांना, शेतीला, मत्सव्यवसायाला वर्षभर फायदा होणार आहे. काम पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
===Photopath===
220621\img-20210622-wa0008.jpg
===Caption===
तलाव निर्माण कार्य