मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:12 AM2017-10-26T00:12:59+5:302017-10-26T00:13:19+5:30

आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

Muska-Bhokrandi crushed the way | मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

googlenewsNext
ठळक मुद्देठिकठिकाणी मोठमोठे खड्डे : जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निद्रावस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
मुस्का परिसरातील तळेगाव, खांबाडा, भाकरोंडी, नवेगाव, बांधोना, सालेभट्टी, नवतळा, निमगाव आदी गावातील शेकडो नागरिक दररोज याच मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर निघाली आहे. खांबाडा-मुस्कापासून ते वाहनधारक व प्रवाशी भाकरोंडी येथे विविध कामासाठी येतात. येथून धानोरा, गडचिरोली तर काही प्रवाशी आरमोरी, कुरखेडाकडे प्रयाण करतात. विद्यालय, महाविद्यालय, शिक्षण, पोलीस ठाणे व तालुकास्तरावरील इतर कामांसाठी याच मार्गाने या भागातील नागरिक आरमोरी तालुका मुख्यालयाकडे जातात. थेट व सोयीचा मार्ग म्हणून याच मार्गाने नागरिक आवागमन करतात. त्यामुळे या भागातील सदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर चालणारी अनेक चारचाकी वाहने भंगार झाली आहेत. दुचाकी वाहनांनाही बºयाचदा अपघात घडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम विभागामार्फत पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी देलनवाडी, मानापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आरमोरी तालुक्यातील अनेक मार्गांची दुरवस्था
आरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शिक्षणाच्या विविध सोयी आहेत. शिवाय चांगल्या प्रकारची बाजारपेठ आहे. विविध शासकीय कार्यालय असल्याने योजनांच्या लाभासाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिक दररोज आरमोरी तालुका मुख्यालयी येतात. मात्र तालुकास्थळी येण्यासाठी असलेल्या बहुतांश मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था वाईट आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक प्रवास करीत आहेत. बहुतांश ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वॉर्डावॉर्डातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. शासकीय योजनेतून मंजूर झालेली रस्त्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन कामे मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Muska-Bhokrandi crushed the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.