सीएए विरोधात मुस्लीम महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:33+5:30

सीएए कायदा मुस्लीम समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप या समाजामार्फत होत आहे. त्यामुळे सदर कायदा रद्द करावा, यासाठी गडचिरोलीतही मुस्लीम समाजातर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यात मुस्लीम नागरिकांसह महिला सुध्दा सहभागी झाल्या होत्या. अनेक वेळा आंदोलने करूनही सरकार कायदा रद्द करीत नसल्याने दिल्ली येथील शाहीन बाग येथे महिलांतर्फे आंदोलन केले जात आहे.

Muslim women’s movement against CAA | सीएए विरोधात मुस्लीम महिलांचे आंदोलन

सीएए विरोधात मुस्लीम महिलांचे आंदोलन

ठळक मुद्देदिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा : जवळपास २०० महिलांचे रात्री धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील शाहीन बाग येथे मागील अनेक दिवसांपासून मुस्लीम महिलांतर्फे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून गडचिरोली येथील मुस्लीम महिलांनी मुख्य बाजारपेठेतील मदनीपुरा चौकातील जामा मशीद येथे २८ जानेवारीपासून दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सीएए कायदा मुस्लीम समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप या समाजामार्फत होत आहे. त्यामुळे सदर कायदा रद्द करावा, यासाठी गडचिरोलीतही मुस्लीम समाजातर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यात मुस्लीम नागरिकांसह महिला सुध्दा सहभागी झाल्या होत्या. अनेक वेळा आंदोलने करूनही सरकार कायदा रद्द करीत नसल्याने दिल्ली येथील शाहीन बाग येथे महिलांतर्फे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून गडचिरोली शहरातीलही मुस्लीम महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन एजाज शेख, वसीम खान, रहिम खान, रफीक पठाण यांच्या नेतृत्वात सुरू आहे. आंदोलनात फिजा पठाण, अतीया खान, शाहीन शेख, आसीया शेख, कसीना खान, शबनम पठाण, सुलताना खान, जरीना शेख, नजता शेख, सुप्रीया शेख, यास्मिन शेख यांच्यासह जवळपास १५० ते २०० महिला सहभाग नोंदवित आहेत.

Web Title: Muslim women’s movement against CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.