नान्हीच्या शाळेची डागडुजी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:27 AM2019-07-11T00:27:30+5:302019-07-11T00:27:52+5:30

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली व नान्ही येथील कौलारू इमारती जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन इमारत बांधेपर्यंत नान्ही येथील कौलारू इमारतीची डागडुजी केली जात आहे.

Nanyhee school's renovation continues | नान्हीच्या शाळेची डागडुजी सुरू

नान्हीच्या शाळेची डागडुजी सुरू

Next
ठळक मुद्देनिर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर : निधी मिळेपर्यंत इमारतीत विद्यार्थ्यांची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली व नान्ही येथील कौलारू इमारती जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन इमारत बांधेपर्यंत नान्ही येथील कौलारू इमारतीची डागडुजी केली जात आहे.
चिखली व नान्ही येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. चिखली शाळेत १५० तर नान्ही शाळेत ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या चांगली असतानाही इमारत बांधण्याकडे मात्र जिल्हा परिषद व शासनाचे दुर्लक्ष झाले. चिखली व नान्ही या दोन्ही ठिकाणी कौलारू इमारती आहेत. सदर इमारतींना ५० वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. या धोकादायक असल्याने सदर इमारती निर्लेखित कराव्या, अशी मागणी गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामपंचायत व पंचायत समिती कुरखेडाने केली होती. निर्लेखनाचा प्रस्ताव आता मंजूर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही इमारती पाडल्या जाणार आहेत. मात्र अजूनपर्यंत नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध होऊन नवीन इमारत बांधेपर्यंत शाळांची डागडुजी होणे आवश्यक आहे. नान्ही येथील कौलारू इमारत गळत असल्याने या इमारतीची डागडुजी केली जात आहे.
पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिखली व नान्ही येथील शाळांना भेट देऊन पाहणी केली.
चिखली येथील शाळेच्या विदारक स्थितीतीची माहिती उपसरपंच अनिल मच्छीरके यांनी विशद केली. इमारतीची डागडुजी करण्याचे आश्वासन पंचायत समिती सभापती व जि.प.सदस्य तुलावी यांनी दिली.

चिखलीच्या शाळेची दुरवस्था
चिखलीच्या शाळेतही चांगली पटसंख्या आहे. मात्र इमारत कौलारू आहे. अनेक लाकडी फाटे कुजले आहेत. एका खोलीवरील फाटे पूर्णपणे कुजले. त्यामुळे त्या ठिकाणचे कवेलू कोसळले. परिणामी सदर खोली निकामी झाली आहे. याही शाळेची इमारत निर्लेखित करून या ठिकाणी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Web Title: Nanyhee school's renovation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा