जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:32 AM2018-05-10T00:32:05+5:302018-05-10T00:32:05+5:30

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,.....

Natural dry pond in the forest | जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

Next
ठळक मुद्देखोदतळ्यात टंँकरद्वारे पाणीसाठा : वन विभागाकडून वन्यजीवांसाठी केली जात आहे सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे, अशा ठिकाणी खोदतळ्यात व कोरडे पडलेल्या पाणवठ्यात वन विभागामार्फत टँकरद्वारे पाणीसाठा केला जात आहे.
आरमोरी वन परिक्षेत्रातील अरसोडा, कासवी, रवी, वैरागड, डोंगरतमाशी व इतर वनक्षेत्रात साधारणपणे ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे, त्या परिक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात तसेच स्वनिर्मित खोदतळ्यात आरमोरी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी टँकरद्वारे पाणीसाठा करीत आहेत. वाढत्या तापमानात वन्यजीवांची यातून पाण्याची व्यवस्था होत आहे. जंगलात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने वन्यजीव तहाण भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेतात आणि त्याची शिकार केली जाते. हे टाळण्यासाठी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने त्याच ठिकाणी वन्यजीवांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. असे असले तरी वनाधिकारी व कर्मचारी गॅस कनेक्शन वाटप करणे, तेंदू बोनसचे वाटप करणे व मानवीकृत रोपवाटीकांचे बोगस बिल पाठविण्यात व्यस्त आहे.
आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना संजीवनी मिळत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागात यंदा राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या, वनतलाव, खोदतळे पूर्णत: आटले असल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

आरमोरी वन परिक्षेत्रातील जे नैसर्गिक पाणवठे आहे, ते पूर्णत: कोरडे पडले आहे. दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वन्यप्राण्यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याशिवाय वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या ठिकाणच्या खोदतळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी सुविधा होत आहे.
- एच. जी. बारसागडे,
वन परिक्षेत्राधिकारी, आरमोरी

Web Title: Natural dry pond in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.