अधिकाऱ्यांनी जाणले नक्षलविरोधी अभियान तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:10 PM2018-01-28T22:10:24+5:302018-01-28T22:10:38+5:30

भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅच क्रमांक २०१७ मधील १८ अधिकाऱ्यांच्या चमूने धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलीस मदत केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नक्षलविरोधी अभियान कशा पद्धतीने चालविले जाते. याबाबतची माहिती पोलीस अधिकाºयांकडून जाणून घेतली.

Naxal-affected campaign mechanism | अधिकाऱ्यांनी जाणले नक्षलविरोधी अभियान तंत्र

अधिकाऱ्यांनी जाणले नक्षलविरोधी अभियान तंत्र

Next
ठळक मुद्देयोजनांची माहिती : कारवाफा पोलीस मदत केंद्राला भेट; विविध ठिकाणांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅच क्रमांक २०१७ मधील १८ अधिकाऱ्यांच्या चमूने धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलीस मदत केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नक्षलविरोधी अभियान कशा पद्धतीने चालविले जाते. याबाबतची माहिती पोलीस अधिकाºयांकडून जाणून घेतली.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या गंभीर आहे. डावपेच आखूनच नक्षल्यांसोबत दोन हात केले जातात. यासाठी पोलीस विभाग वापरत असलेले तंत्रांबाबतची माहिती देण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांच्या संरक्षणासाठी लढण्याबरोबरच या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीही पोलीस विभाग प्रयत्नरत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली सामान्य जनतेच्या विकासासाठी पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्राच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. याचीही माहिती दिली. गडचिरोली पोलीस दलाने कनेक्टिंग गडचिरोली प्रोजेक्ट अंतर्गत वायफायद्वारे शासकीय कार्यालये जोडली असून याची कार्यपद्धती प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे उपस्थित होते.
तीन दिवसांच्या दौºयादरम्यान प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांनी वन विभाग, आश्रमशाळा, लेखामेंढा ग्रामसभा व पोलीस मदत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष तेथील कामकाज कसे चालते, याविषयीची माहिती जाणली. अधिकारी बनल्यानंतर प्रशासन चालविताना हा सर्व अनुभव त्यांना मदतगार ठरणारा आहे.

Web Title: Naxal-affected campaign mechanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.