नक्षल सेलच्या पोलीस जवानाचा आकस्मिक मूत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:58 PM2018-12-26T21:58:50+5:302018-12-26T21:59:11+5:30
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नक्षल सेलमध्ये कार्यरत पोलीस जवान अरूण भुजंगराव कळते यांचा मंगळवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नक्षल सेलमध्ये कार्यरत पोलीस जवान अरूण भुजंगराव कळते यांचा मंगळवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थित पोलीस जवानांनी त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस विभागाकडून त्यांना अनेकदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
अरूण कडते हे मंगळवारी आपल्या कार्यालयात बसले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. लगेच सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिवर त्यांच्या घरी आणल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत पोलीस जवानांनी मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिण व बराच मोठा आप्त परिवार आहे.