पोलिसांनी नष्ट केले नक्षल स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:34 AM2018-07-18T00:34:39+5:302018-07-18T00:35:18+5:30
भामरागड तालुक्यातील तोयनार जंगल परिसरात नक्षल्यांनी नक्षल स्मारक निर्माण केले होते. सी-६० पोलीस व सीआरपीएफ जवानांनी सदर स्मारक नष्ट केले. पोलिसांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवाद्यांकडून दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल शहीद सप्ताह पाळला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील तोयनार जंगल परिसरात नक्षल्यांनी नक्षल स्मारक निर्माण केले होते. सी-६० पोलीस व सीआरपीएफ जवानांनी सदर स्मारक नष्ट केले.
पोलिसांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवाद्यांकडून दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल शहीद सप्ताह पाळला जातो. या कालावधीत प्रामुख्याने स्मारके बांधली जातात. या स्मारकांच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा महत्त्वाचा उद्देश राहतो.
कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेला तोयनार जंगल परिसरात सीआरपीएफ व सी-६० जवान यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षल शोधमोहीम राबविली जात होती. या दरम्यान नक्षलवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. पोलिसांनी सतर्कता बाळगत स्मारक नष्ट केले. यावेळी गावकरी सुध्दा उपस्थित होते. सदर कारवाई भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कोठी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी शिंदे, पोलीस उपनिरिक्षक कराडे, सीआरपीएफचे पोलीस निरिक्षक परविंद्र यांनी केली.