भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर

By संजय तिपाले | Published: September 21, 2023 12:36 PM2023-09-21T12:36:28+5:302023-09-21T12:38:11+5:30

संघटनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य:  हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्धाची हाक

Naxal posters seen on the road in Bhamragarh taluka, A call for people's war against Hindutva ideology | भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर

भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर

googlenewsNext

गडचिरोली : माओवादी संघटनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त २१ सप्टेंबरपासून सप्ताहाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम दोडराज पोलिस ठाणे हद्दीतील हिंदेवाडा येथे मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी पोस्टर झळकावून हिंदुत्वववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्धाची हाक दिली. दरम्यान, पोलिसांनी हे पोस्टर काढले असून तपास सुरु केला आहे.

माओवादी संघटनेच्या १९ वा वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय समितीने ऑगस्टमध्ये २८ पानांचे पत्रक काढून थेट भाजपला इशारा दिला होता. वर्धापनदिनानिमित्त २१ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान क्रांतीकारी उत्साहात सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी २१ सप्टेंबरला भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा फाट्यावरील रस्त्यावर दोन झाडांना नक्षल्यांनी पोस्टर लावले. त्यात संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त नक्षल सप्ताह उत्साहात व दृढ संकल्पासह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

ब्राम्हणीय हिंदुत्ववादाविरुध्द लढा देण्यासाठी व्यापक जनयुद्धाची हाक दिली आहे. संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. पोस्टरखाली केंद्रीय कमिटी भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे. दरम्यान, या पोस्टरने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत  पोस्टर ताब्यात घेतले.

धोडराज पोलिस ठाणेद हद्दीतील हिंदेवाडा फाटा रस्त्यावर नक्षल पोस्टर आढळले आहे. ते ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. त्या भागात पोलिस अधिक अलर्ट आहेत, सी- ६० चे जवान तळ ठोकून आहेत.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Web Title: Naxal posters seen on the road in Bhamragarh taluka, A call for people's war against Hindutva ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.