प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:43+5:302021-08-22T04:39:43+5:30
पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २७ कोटी रुपयांच्या कामांच्या शुभारंभासह ४६ वाहने व रुग्णवाहिका, ऑक्सिजन ...
पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २७ कोटी रुपयांच्या कामांच्या शुभारंभासह ४६ वाहने व रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट, जलतरण तलावाचे लोकार्पण झाले. यावेळी मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डाॅ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना पालकमंत्री पुढे म्हणाले, विकासकामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्याप्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच ५०० काेटी रुपयांच्या रस्ते व पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतीक्षेत असलेले मेडिकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील ब्रीजकम बंधारे यातून दळणवळणाला चालना मिळाल्याचे सांगितले. यावेळी पोलीस क्रीडांगणावर नव्याने बांधण्यात आलेल्या किल्ला भिंतीचे अनावरण करण्यात आले.
बाॅक्स
गडचिरोली बदलत आहे – विजय वडेट्टीवार
गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की ‘अब गडचिरोली बदल रही है’ असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. सध्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचे मोठे पाऊल टाकत आहोत. वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पूर्ण होतील असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पद्धतीचे आधुनिक आपत्तीमध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे त्यांनीयावेळी सांगितले.
बाॅक्स
या कामांचे झाले लाेकार्पण
- जिल्हा सामान्य रुग्णालयातील नव्याने स्थापन केलेल्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ केला.
- २००ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे व बायोमेडीकल वेस्टेज व लाँड्रीचा शुभारंभ.
- कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ. यासाठी अडीच काेटी रुपये मंजूर
-नव्याने नूतनीकरण केलेला जलतरण तलावाचे उद्घाटन
बाॅक्स
क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन
पोटेगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन बांधकामाचे भूमिपूजन याकरीता ४४.५१ कोटींचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केला आहे. यातील २७ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पैकी बांधकामाकरीता रुपये २४ कोटी ३१ लक्ष रुपयांचे काम सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. १८ महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे. या कामामध्ये प्रशासकीय इमारत तयार करणे, इनडोअर हॉल, बॅडमिंटन हॉल, २ सुरक्षारक्षक कक्षासोबत १ मुख्य प्रवेश द्वार, कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) बांधण्यात येणार आहे.
- पुढील टप्प्यात जिल्हा क्रीडा संकुलाकरीता उपलब्ध असलेल्या जागेवर ३५ कोटी रुपये खर्चून प्रेक्षक गॅलरी, मुलामुलींचे
वसतिगृह, जलतरण तलाव, विविध खेळांचे मैदान, अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकाम नियोजित आहे.
बाॅक्स
आराेग्य विभागाला मिळाल्या ३३ रुग्णवाहिका
- मुख्यमंत्री निधीमधून ९ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका दवाखान्यांमध्ये ठेवल्या जाणार आहे.
- सीएसआर निधीतून २४ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिका काेराेनाचे लसीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार आहेत.
- जिल्हा विकास निधीतून पाेलीस विभागाला १३ वाहने देण्यात देण्यात आली आहे.
- फायर ब्रिगेडची वाहनेही देण्यात आली.