गडचिरोलीत वृक्षलागवडीविरोधात नक्षलवाद्यांची पत्रकबाजी, वन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 11:37 AM2022-11-12T11:37:23+5:302022-11-12T12:33:31+5:30
वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
झिंगानूर (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर या दुर्गम भागात वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या वृक्षलागवडीला नक्षलवाद्यांनी विरोध दर्शवत हे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना जिवाला मुकावे लागेल, अशी धमकी पत्रकांमधून दिली आहे.
गावातील आंबेडकर चौक ते दवाखान्यापर्यंतच्या चौकापर्यंत शुक्रवारी सकाळी ही लाल शाईने लिहिलेली पत्रके आढळली. त्यात वनविभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे. ही दादागिरी बंद केली नाही तर जीवे मारण्याची सजा दिली जाईल, असा मजकूर भाकपा (माओवादी) यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.