गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी भाजीपाल्याचा ट्रक जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:51 PM2019-01-31T12:51:06+5:302019-01-31T13:08:12+5:30
कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या परिसरात २५ ते ३१ जानेवारीदरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात प्रतिकार सप्ताह साजरा करीत बंद पाडण्याचे आवाहन प्रतिबंधित नक्षल संघटनेने बॅनर लावत केले होते. मात्र या आवाहनाचा कोणताच प्रभाव जनजीवनात जाणवत नव्हता. मात्र रात्री २० ते २५ चा संख्येत असलेल्या नक्षल्यांनी कोरची घाटावरील पहिल्या वळणावर चंद्र्रपूर वरून रायपूरकडे जात असलेल्या ट्रकला थांबवत त्यातीलच डिझेल वाहनावर शिंपडत पेटवून दिले. तसेच ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून वाहतूक बंद पाडली. आज सकाळी वर्तमानपत्रे घेऊन कोरचीकडे जाणारे वाहन पोहचू शकले नाही. तसेच सकाळच्या कोरची नागपूर व इतर बसेससूद्धा अडकून पडलेल्या आहेत.