नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:23 AM2018-04-30T01:23:46+5:302018-04-30T01:23:46+5:30

पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केले.

Naxals should come to mainstream | नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे

नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे आवाहन : सी-६० व सीआरपीएफ जवानांचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केले.
जिल्हा पोलीस मुख्यालयाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट देऊन पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे अभिनंदन केले. तसेच दोन नक्षली कारवायांत ४० नक्षल्यांना ठार करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील सी-६० जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले. ही अतिशय खडतर परिस्थितीत राहून प्रभाविपणे सातत्त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर यश मिळविल्याचे नमूद करीत गृह राज्यमंत्र्यांनी कसनासूर व नैनेर जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी सी-६० पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सीआरपीएफ जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे आभार मानत आपल्या प्रेरणेमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य वाढले आहे. गडचिरोली पोलीस दल प्रामाणिकपणे भविष्यात काम करत राहील. तसेच नक्षल्यांविरोधातील मोहीम तत्परतेने राबविली जाईल, अशी ग्वाही दिली.

Web Title: Naxals should come to mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.