राष्ट्रवादी पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:45+5:302021-08-14T04:41:45+5:30
देसाईगंज तालुक्यातील चोप या गावी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने तेथे जाऊन चोप ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती घेतली. याप्रसंगी सरपंच नितीन लाडे, ...
देसाईगंज तालुक्यातील चोप या गावी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने तेथे जाऊन चोप ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती घेतली. याप्रसंगी सरपंच नितीन लाडे, माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी, राधेश्यामजी बरैया हजर हाेते. ए ए एनर्जी पॉवर प्लांटपासून देसाईगंज, तसेच आजूबाजूच्या गावांतील लोकांना उडणाऱ्या फ्लाय ॲशपासून त्रास होत असल्याची माहिती शिवणकरांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह पॉवर प्लांटला भेट दिली. याप्रसंगी खान यांनी येत्या २ ते ३ दिवसांत लोकांना होणारा त्रास कमी करण्याकरिता तांत्रिक दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी न्यायाधीश ज्ञानदेवजी परशुरामकर यांची भेट घेऊन चर्चा करून जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि जिल्ह्याच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली. बैठकीला आरमाेरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे, प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, युवक प्रदेश सचिव कृपाल मेश्राम, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, जिल्हा उपाध्यक्ष दादाजी भर्रे, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, राहुल पुस्तोडे, मनोज ढोरे, मनोज तलमले, हिरा मोटवानी, मिलिंदभाऊ सपाटे, शैलेशजी पोटूवार, शुभम मेश्राम, लतीफ शेख, प्रतिभाताई साखरे आदींची उपस्थिती हाेती.
130821\img-20210813-wa0049.jpg
शरद सोनकुसरे मार्गदर्शन करतांना