गॅस दरवाढीविराेधात राष्ट्रवादीचे अहेरीत आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:32 AM2021-02-08T04:32:28+5:302021-02-08T04:32:28+5:30
अहेरी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अहेरी येथे शनिवारला गॅस दरवाढीविराेधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदाेलन व निदर्शने करण्यात आली. विशेष ...
अहेरी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अहेरी येथे शनिवारला गॅस दरवाढीविराेधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदाेलन व निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भाकऱ्या बनविल्या.
दिवसेंदिवस गॅस व इंधनची दरवाढ होत असून, पेट्रोल - डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. या महागाईविराेधात अहेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी गाेवऱ्यावर चूल पेटवून भाकऱ्या थापल्या व स्वयंपाक बनविला. गॅस, इंधन दरवाढीचा भडका उडत असल्याने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली. यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने २७ डिसेंबर राेजी अशाच प्रकारचे आंदाेलन केंद्र सरकारच्या विराेधात करण्यात आले हाेते. या आंदाेलनानंतर शासनाने दरवाढ मागे घेतली नाही. त्यामुळे पुन्हा लक्ष वेधून घेण्यासाठी ६ फेब्रुवारी राेजी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर यांच्या मार्गदर्शनात पुन्हा आंदाेलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार, शामला बेझंकीवार, पद्मा संगाेजी, सुजाता सडमेक, रंजिता पुपाला आदी उपस्थित हाेते. या आंदाेलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी केले.
===Photopath===
070221\07gad_2_07022021_30.jpg
===Caption===
स्वयंपाकासाठी चूल पेटविताना राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या.