प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:13 AM2018-08-23T01:13:49+5:302018-08-23T01:14:54+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारला गडचिरोलीचा दौरा करून येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ रचनेतून राकाँच्या कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीच्या कामाला जोमाने भिडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारला गडचिरोलीचा दौरा करून येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ रचनेतून राकाँच्या कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीच्या कामाला जोमाने भिडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जयंत पाटील यांच्या दौºयाने राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील वासेकर लॉनमध्ये आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री अनिल देशमुख, आ.प्रकाश गजभिये, माजी आ.हरीराम वरखडे, निरीक्षक राजेंद्र वैद्य, प्रभारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, प्रवीण कुंटे, प्रकाश ताकसांडे, जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, ऋषी पोरतेट, ग्यानकुमारी कौशी, युद्धीष्ठीर बिश्वास, श्याम धाईत, प्रा.ऋषिकांत पापडकर, सोनाली पुण्यपवार, प्रभाकर बारापात्रे, मुश्ताक शेख, नंदलाल लाडे, फहीम काझी, युनूस शेख, जगन जांभुळकर, कबीर शेख आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला पुनर्वभैव प्राप्त करून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मार्गी लावाव्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. संवाद प्रक्रियेदरम्यान तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व सर्व सेलच्या अध्यक्ष व तसेच कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन आणि जिल्ह्यातील विविध ज्ज्वलंत प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला राकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला अहे.