पळसगावजवळ उंच पूल बांधण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:33+5:302021-03-22T04:33:33+5:30
जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ३५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर पूल ठेंगणा आहे. पावसाळ्यात ...
जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ३५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर पूल ठेंगणा आहे. पावसाळ्यात येथून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे. आरमोरीवरून पळसगाव मार्गे शंकरपूर, बोडधा, कुरखेडा, अर्जुनी, गोंदिया येथे प्रवास करणाऱ्यांसाठी सदर मार्ग सोयीचा असल्याने येथून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. तसेच कासवी, आष्टा, अंतरजी, रामपूर येथील विद्यार्थी पळसगाव येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. पावसाळाभर या पुलावरून अनेकदा पाणी वाहत असते. जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते. पूल मोडकळीस आला आहे. त्यामुळे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.