संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:06 PM2018-01-21T23:06:08+5:302018-01-21T23:06:23+5:30

स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहाण्याची गरज असून शाळांमधूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जाऊ शकतात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी केले.

 The need to create a decent generation | संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज

संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज

Next
ठळक मुद्देरामदास आंबटकर यांचे प्रतिपादन : कुरखेडा येथे पाच दिवशीय कला संस्कार महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहाण्याची गरज असून शाळांमधूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जाऊ शकतात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी केले.
कुरखेडा येथील आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेद्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल, श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय व श्रीराम वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पाच दिवशीय कला संस्कार वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्षा तथा विहिंपचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समितीचे कोषाध्यक्ष गोविंद सारडा, संस्थेचे सचिव दोषहर फाये, उपाध्यक्ष गजानन येलतुरे, सहसचिव नागेश फाये, गुणवंत फाये, चांगदेव फाये, हुंडीराज फाये, डॉ. तेजराम बुध्दे, राम लांजेवार, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, मनिष फाये, निलकंठ खुणे, प्राचार्य पी. टी. कवाडकर, प्राचार्य पी. डब्ल्यू. भरणे, प्राचार्य देशमुख, प्राचार्य देवराव गजभिये उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. तेजराम बुध्दे, आदर्श शिक्षक रवीकांत मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चांगदेव फाये, संचालन विनोद नागपूरकर तर आभार लिलाधर बडवाईक यांनी मानले.

Web Title:  The need to create a decent generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.