मासिक पाळीबाबतच्या गैरसमजुती दूर करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:48+5:302021-08-21T04:41:48+5:30
देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा येथे आरोग्य प्रबोधिनीच्या पुढाकाराने आदित्य बिर्ला एज्युकेशन टस्ट व समाजबंधच्या सहकार्याने ‘मासिक पाळीचे ...
देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा येथे आरोग्य प्रबोधिनीच्या पुढाकाराने आदित्य बिर्ला एज्युकेशन टस्ट व समाजबंधच्या सहकार्याने ‘मासिक पाळीचे आरोग्यदायी नियोजन’ याविषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करीत हाेत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काेंढाळाच्या सरपंच अपर्णा राऊत हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच गजानन सेलोटे, पोलीस पाटील किरण कुंभलवार, ग्रा. पं.सदस्य नलिना वालदे, शिल्पा चौधरी, शेषराव नागमोती, प्रतिमा राऊत, कल्पना झिलपे, नलिनी मेश्राम, उर्मिला दुपारे, सपना शेंडे उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या स्नेहल पवार, समाजबंधचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोंढाळातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभने, संचालन प्रियंका ठाकरे तर आभार अर्चना गभने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती पुराम यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
बाॅक्स
मार्गदर्शनासह पॅडचे वितरण
देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये मासिक पाळीबाबत शास्त्रशुद्ध माहिती देत पौगंडावस्थेत होणारे शारीरिक, भावनिक बदल, पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आहार, स्वच्छतेच्या सवयी, शोषक साहित्याचा वापर व विल्हेवाट याविषयी चार दिवस माहिती देण्यात आली. शिवाय पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून पाळीविषयी शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यावर आरोग्य प्रबोधिनीच्या पुढाकाराने सत्राच्या माध्यमातून भर देण्यात आला. सत्रानंतर आदित्य बिर्ला एजुकेशन ट्रस्टमार्फत मुलींना मोफत पॅडचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्यात एकूण ३०० मुलींना या माध्यमातून माहिती देण्यात आली.