चिमुकल्या स्वराजच्या शस्त्रक्रियेसाठी हवी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:44 AM2021-09-08T04:44:09+5:302021-09-08T04:44:09+5:30
स्वराज हा बालक दोन वर्षांचा असताना त्याला लिव्हर कॅन्सरचा आजार झाल्याचे आई-वडिलांना कळले. मोलमजुरी करून जेवढे पैसे कमावले ...
स्वराज हा बालक दोन वर्षांचा असताना त्याला लिव्हर कॅन्सरचा आजार झाल्याचे आई-वडिलांना कळले. मोलमजुरी करून जेवढे पैसे कमावले होते तेवढे पैसे लावून एक वर्ष त्याच्या वडिलांनी उपचार केले. त्यानंतर त्याला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यास डॉक्टरांनी सांगितले; परंतु नागपूर येथे राहण्याचा व इतर खर्चासाठी दहा ते वीस हजार रुपये लागणार होते. पाच सहा महिने उलटूनही पैशाचा बंदोबस्त झाला नाही. ही अडचण देऊळगाव येथील होतकरू तरुणांना माहीत होताच गावातून त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभी केली. त्यानंतर स्वराजला उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. तेथून लिव्हरच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
(बॉक्स)
हलाखीच्या परिस्थितीमुळे वडील हतबल
ऑपरेशनसाठी लागणाऱ्या ३५ लाखांच्या खर्चापैकी टाटा हॉस्पिटल ३० लाखांचा खर्च उचलण्यास तयार आहे. स्वराजच्या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये जमविणे कठीण आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी व चिमुकल्या स्वराजला जीवनदान द्यावे, याकरिता स्वराजचे वडील दीपक मडावी यांनी बॅँक खात्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे.
070921\img_20210907_151112.jpg
देऊळगाव येथील स्वराज मडावी या बालकाचा फोटो