स्वच्छतेसाठी मतपरिवर्तनाची गरज
By admin | Published: January 12, 2017 12:50 AM2017-01-12T00:50:18+5:302017-01-12T00:50:18+5:30
माणसाच्या आरोग्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले आहे.
शांतनू गोयल यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ४८ स्पर्धक सहभागी
गडचिरोली : माणसाच्या आरोग्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. स्वच्छतेचे खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकांच्या परिवर्तनाची गरज आहे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने बुधवारी येथील चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून सीईओ गोयल बोलत होते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एल. वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. माळी होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे यांनी तर संचालन करिश्मा राखुंडे यांनी केले. तर आभार एकनाथ सेलोटे यांनी मानले. स्पर्धेला परीक्षक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. डॉ. नरेश मडावी, प्रा. डॉ. विवेक जोशी, अॅड. कविता मोहरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल मडावी, अमित पुंडे, शैलेश ढवस, सदानंद धुडसे, योगेश फुसे, प्राशिष कोंदबत्तुलवार, रोशन चकोले, एकनाथ सेलोटे, रमाकांत कायरकर, केवळराम कायरकर, संजनी कांबळे आदींनी सहकार्य केले. या स्पर्धेत दोन्ही गटातून एकुण ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत वरिष्ठ गटातून वृषभ मेश्राम याने प्रथम, नसिमा गावडे हिने द्वितीय तर नम्रता डेंगानी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कनिष्ठ गटातून करिश्मा कोडापे हिने प्रथम, खुशबू दुर्गे द्वितीय तर यतीश जाधव याने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)