मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:41 AM2018-09-15T01:41:50+5:302018-09-15T01:43:22+5:30

मुलगाच व्हावा म्हणून काही जोडपी गरोदरपणीच सोनोग्राफीव्दारे गर्भाची तपासणी करतात. स्त्रिलिंगी गर्भ असेल तर निर्दयीपणे गर्भपात करुन त्या जिवाचा छळ करतात. यामुळेच समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे.

The need for raising girls' birth rates | मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज

मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय दक्षता पथकाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलगाच व्हावा म्हणून काही जोडपी गरोदरपणीच सोनोग्राफीव्दारे गर्भाची तपासणी करतात. स्त्रिलिंगी गर्भ असेल तर निर्दयीपणे गर्भपात करुन त्या जिवाचा छळ करतात. यामुळेच समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. ३ वर्ष कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. मुलींचा
वाढण्याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गर्भधारणेपूर्वी व प्रसुतीपूर्वी निदानतंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हास्तरीय दक्षता पथकाची सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. मसराम, जिल्हा माहिती
अधिकारी प्रशांत दैठणकर, पोलीस उप अधीक्षक (गृह) प्रदीप चौगावकर, अ‍ॅड. तृप्ती राऊत उपस्थित होते. आॅगस्टअखेर समितीने २२ सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्राची तपासणी करण्यात आली. पुढील कालावधीची त्रैमासिक तपासणी सुरु आहे, अशी माहिती अ‍ॅड. तृप्ती राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रात अवैध गर्भपात होत असल्यास याची शंका आल्यास नागरिकांनी सामाजिक दायीत्व म्हणून आॅनलाईन तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.

तीन लाख बालकांवर होणार लसीकरण
जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयाच्या प्रत्येक बालकांचे गोवर-रूबेला लसीकरण होण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी दिल्या. राज्यात नोव्हेंबर महिन्यात या महत्त्वाकांक्षी राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. यात राज्यात एकूण ३ कोटी ३७ लाख बालकांना लसीकरण करायचे आहे. यातील साधारणपणे ३ लाख बालके ही गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. याबाबत जिल्हास्तरावर एक कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी कामरान शेख, युनिसेफ प्रतिनिधी डॉ. ज्योती पोतरे आदींसह लायन्स क्लबच्या संध्या येलेकर व सतीश येलेकर उपस्थित होत्या.

Web Title: The need for raising girls' birth rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.