शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:26+5:30

सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना सामूहिक शपथ देऊन भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून काढण्यात आलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Need for sports for physical and mental development | शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळांची गरज

शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळांची गरज

Next
ठळक मुद्देजि.प.अध्यक्ष कंकडालवार : बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी : खेळांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊन नवचैतन्य निर्माण होते. क्रीडा गुणांमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. याशिवाय क्रीडा गुणांसह कलागुणांमुळे व्यक्तिमत्व विकास होत असल्यामुळे शालेय जीवनात खेळांची तितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. येथील क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तसेच पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्र ीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि.५) मोठ्या थाटामाटात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.सदस्य अनिल केरामी, विद्या आभारे, कल्पना आत्राम, अनिता आत्राम, सुनिता कुसनाके, अजय नैताम, ऋषी पोरतेट, प्रभाकर तुलावी, कोदंडधारी नाकाडे, विनोद लेनगुरे, नीता साखरे, कविता भगत, रवींद्र शहा, जयसुधा जनगाम, श्रीदेवी पांडवला आदी जि.प.सदस्य आणि अहेरी पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी प्रफुल्ल म्हैसकर, सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीता चालूरकर, सदस्य सुरेखा आलम, प्रशांत ढोंगे, छाया पोरतेट, शीतल दुर्गे, आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, उपसरपंच पुष्पा अलोने, नागेपल्लीच्या सरपंच सरोज दुर्गे, मलरेड्डी येमनूरवार, व्येंकटरावपेठाचे सरपंच संपत सिडाम, सुरेश गड्डमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कंकडालवार म्हणाले, जि.प.च्या सर्व शाळांची आवश्यक ती दुरूस्ती आणि नवीन वर्गखोल्या देण्यात येईल. विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा गणवेश दिले जात आहे. याशिवाय जि.प.मार्फत शाळांना कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. दोन वर्षानंतर हे क्रीडा संमेलन घेताना राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा न ठेवता आपल्यासह सर्व सदस्यांनी जिल्हा निधीतून हे संमेलन घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना सामूहिक शपथ देऊन भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून काढण्यात आलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी प्रत्येक तालुक्यातील शाळांनी देशभक्तीपर नृत्य व देखावे सादर करून सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविले. समारंभाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांनी तर संचालन गौतम मेश्राम व शैलेजा गोरेकर यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी मानले.
कार्यक्रमासाठी अशोक दहागावकर, श्रावण दुर्गे, अजय सोनलवार, किशोर सूनतकर, तेजराव दुर्गे, लक्ष्मण गदेवार, विनायक वेलादी, लक्ष्मण दुर्गे, विनता कन्नाके, अवधुत धनंजय पाटील, उमा मडावी, रवी येमसलवार, उमेश चिलवेलवार, सिराज शेख आदी शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, पालक वर्ग व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

अहेरी तालुक्याला दुसऱ्यांदा मान
जिल्हा परिषदेचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा बहुमान यावेळी दुसऱ्यांदा अहेरी तालुक्याला मिळाला. यापूर्वी जि.प.उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम असताना हे संमेलन अहेरी येथे झाले होते.
८ फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन चालणार असून यात वैयक्तिक आणि सांघिक खेळ होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवरांचे आदिवासी ढोल नृत्य व लेझिम नृत्याने तर शिक्षकांनी फुले उधळून स्वागत केले.

Web Title: Need for sports for physical and mental development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.