स्वयंराेजगारासाठी तंत्रशिक्षण काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:18+5:302021-07-12T04:23:18+5:30

नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची आढावा सभा पार पडली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग जि. ...

The need for technical education time for self-employment | स्वयंराेजगारासाठी तंत्रशिक्षण काळाची गरज

स्वयंराेजगारासाठी तंत्रशिक्षण काळाची गरज

Next

नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची आढावा सभा पार पडली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग जि. प. गडचिरोली यांच्यातर्फे भामरागड, अहेरी, सिरोंचा व एटापल्ली आदी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जिल्ह्यातून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के क्षमता आरक्षित असून, किमान ३५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. शासनाने ठरवून दिलेले अत्यंत माफक शिक्षण शुल्क व मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सोय आणि शासनाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात असल्यामुळे आर्थिक दुर्बल समाज घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ची प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी संस्थेला भेट देऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्रा. सांगाेळे यांनी केले. आढावा बैठकीत शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, शिक्षण विस्तार अधिकारी अमरसिंह गेडाम, लेखाधिकारी नरेश वाळके यांनीही विविध विषयांवर मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

100721\0121img-20210710-wa0087.jpg

तंत्रशिक्षण काळाची गरज"

प्राध्यापक इंद्रजीत सांगोळे यांचे प्रतिपादन करतांना

Web Title: The need for technical education time for self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.