वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन काळाची गरज : तहसीलदार शिकतोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:44+5:302021-06-06T04:27:44+5:30

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चामोर्शी पोलीस स्टेशनच्या वतीने जुन्या एसडीपीओ कार्यालय परिसरात ५ जून रोजी वृक्षारोपण करण्यात ...

Need of time for tree planting along with tree planting: Tehsildar Shiktode | वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन काळाची गरज : तहसीलदार शिकतोडे

वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन काळाची गरज : तहसीलदार शिकतोडे

Next

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चामोर्शी पोलीस स्टेशनच्या वतीने जुन्या एसडीपीओ कार्यालय परिसरात ५ जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. मानवी जीवनात निसर्ग व पर्यावरणाला अन्यनसाधारण महत्त्व आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास, हवा व जलस्रोताचे प्रदूषण ही आजची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार जितेंद्र सिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार हनुमंतू डंबारे, पत्रकार लोमेश बुरांडे, कालीदास बन्सोड, पोलीस हवालदार शालिकराम गिरडकर, दिलीप खोब्रागडे, अरुण कुनघाडकर, चंद्रशेखर गफलवार, संदीप भिवणकर, जीवन हेडावू, मधुकर होळी, ज्ञानेश्वर लाकडे, रायसिंग जाधव, विजय केंद्रे व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या माेकळ्या जागेत पिंपळ, वड, चिंच, कडुनिंब, आंबा, गुलमोहर, करंजी, सीताफळ आदी विविध प्रजातींच्या वृक्षाची लागवड, त्या राेपट्यांचे संगाेपन व संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली.

===Photopath===

050621\img-20210605-wa0208.jpg

===Caption===

वृक्ष लागवड फोटो चामोर्शी

Web Title: Need of time for tree planting along with tree planting: Tehsildar Shiktode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.