महिलांनी शेतीला पूरक कुटीर उद्योग उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:24+5:302021-06-16T04:48:24+5:30
उमेद अभियानांतर्गत कुनघाडा रै येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ...
उमेद अभियानांतर्गत कुनघाडा रै येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कृषी व्यवस्थापक प्रमोद गोवर्धन पुढे बोलताना म्हणाले की, गाव तिथं बचत गटाची निर्मिती झाली आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. महिलांनी कृषी बचत गटाची निर्मिती करून कृषीविषयक व्यवसायास मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात महिला प्रगतिपथावर राहून कृषी विकास साधला आहे. २१ व्या शतकात महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे. अशा वेळी महिलांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता महिला सबलीकरणाची कास धरावी, असे मार्गदर्शन प्रमोद गोवर्धन यांनी केले. कृषीशाळेत भात बिज प्रक्रिया करणे, निंबोळी अर्क तयार करणे, कमी खर्चात शेंद्रिय शेती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दर्शा नैताम, सोनाली कुनघाडकर, वनिता वैरागडे, माधुरी दुधबळे, प्रतिभा भांडेकर, मंदा वासेकर, मोहिनी कुरूळकर व गावातील इतर महिला उपस्थित होत्या.
===Photopath===
140621\1022img-20210614-wa0128.jpg
===Caption===
महिलांनी शेतीला पूरक कुटीर उद्योग उभारण्याची गरज फोटो