काेराेना लसीसाठी माेठी सुई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:22+5:302021-09-13T04:35:22+5:30
काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासानाने उचलली आहे. त्यामुळे डाेज व सुईचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जात आहे. धान ...
काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासानाने उचलली आहे. त्यामुळे डाेज व सुईचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जात आहे. धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. केवळ सिरींजमुळे लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक नागरिकाला ०.५ मिलीलीटर एवढा काेराेना लसचा डाेज दिला जाते. त्यामुळे तेवढ्याच क्षमतेची सिरींज वापरली जात हाेती. आता मात्र १ मिलीलीटर क्षमता असलेली सिरींज वापरली जात आहे.
बाॅक्स
केंद्र शासनाने दिली हाेती पूर्वसूचना
केंद्र शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सिरींजचा तुटवडा निर्माण हाेऊ शकताे त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, अशी सूचना केंद्र शासनाने देऊन ठेवली हाेती. त्यानुसार आराेग्य विभागाने पर्यायी सिरींज उपलब्ध करून दिल्याने लसीकरणाचे काम नियमित सुरू आहे.
बाॅक्स
दर दिवशी १० हजार सिरींजची गरज
राेवणीची कामे आटाेपल्याने आता लसीकरणाची गती वाढली आहे. दर दिवशी जवळपास ८ ते ९ हजार नागरिकांना लस दिल्या जात आहेत. काही सिरींज वेस्टेज गेल्या तरी जवळपास १० हजार सिरींजची गरज पडणार आहे.
काय आहे एडी सिरींज
काेराेना लस देण्यासाठी एडी ही सिरींज पावरली जात आहे. एडी म्हणजेच ऑटाे डिस्पाेजल हाेय. या सिरींजचा पुन्हा पावर करणे शक्य हाेत नाही. तसेच लस वेस्टेज हाेण्याचे प्रमाणही कमी राहते.