दुर्दम्य इच्छाशक्तीने यश शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:27 AM2017-09-13T00:27:20+5:302017-09-13T00:27:20+5:30

आजचे विद्यार्थी उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत. प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात. ध्येय निश्चित करून सातत्त्यपूर्ण परिश्रम व मेहनत घेतल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करता येत नाही.

Negative urge makes success possible | दुर्दम्य इच्छाशक्तीने यश शक्य

दुर्दम्य इच्छाशक्तीने यश शक्य

Next
ठळक मुद्देसागर कवडे यांचे आवाहन : लोकमतच्या ‘स्पर्धेच्या जगात’ सदराची केली प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आजचे विद्यार्थी उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत. प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात. ध्येय निश्चित करून सातत्त्यपूर्ण परिश्रम व मेहनत घेतल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करता येत नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वासानेच स्पर्धा परीक्षेत यश शक्य आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकमत समूह व झेप करिअर अ‍ॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धेच्या जगात’ या सदराचे मान्यवरांच्या हस्ते वाचकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. शशिकांत गेडाम, पोलीस उपनिरीक्षक शीतल राणे, लोकमतचे आरमोरी येथील प्रतिनिधी विलास चिलबुले, महेंद्र रामटेके, वैरागड येथील वार्ताहर प्रदीप बोडणे, झेप करिअर अ‍ॅकॅडमीच्या नताशा मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी लोकमत समुहाने स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासंदर्भात सुरू केलेल्या सदराचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे सदर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सदराचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे उपयोगी सूत्र स्पष्ट केले. पोलीस उपनिरीक्षक शीतल राणे यांनी मार्गदर्शन करतांना परिस्थितीचा बाहू न करता परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची मानसिकता जोपासून परिश्रम करावे, असे आवाहन केले. झेप करिअर अ‍ॅकॅडमीतर्फे ९० गुणांची विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या परीक्षेला ४०० वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रास्ताविक प्रदीप बोडणे, संचालन प्रा. डॉ. विजय गोरडे यांनी केले तर आभार शशिकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र घोनमोडे, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, प्रा. डॉ. उत्तमचंद कांबळे, प्रा. डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रा. छगन मुगमोडे, प्रा. प्रियदर्शन गणवीर, प्रा. डॉ. विजय रेवतकर, प्रा. स्नेहा मोहुर्ले, प्रा. गजानन बोरकर, प्रा. गजेंद्र कढव, सुशील वाटेकर, राकेश पारधी यांनी सहकार्य केले.

Web Title: Negative urge makes success possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.