गावांमध्ये निस्तार डेपो देण्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:47+5:302020-12-25T04:28:47+5:30
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत ...
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
छुप्या पद्धतीने विजेची चोरी सुरूच
गडचिरोली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे.
कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची मागणी आहे.
व्यसनमुक्तीसाठी ग्रा. पं. नी पुढाकार घ्यावा
गडचिरोली : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई करून सुगंधीत तंबाखूची विक्री करण्यावर पायबंद घातला. गावपातळीवर सुगंधीत तंबाखूबंदीसाठी ग्रा. पं. नी पुढाकार घेऊन ग्रामसेवकांना प्रवृत्त करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले
गडचिरोली : भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर धान पीक निघाल्यानंतर त्याच शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळत चालला आहे.