नेहा जिल्ह्यात पहिली

By admin | Published: June 18, 2014 12:11 AM2014-06-18T00:11:00+5:302014-06-18T00:11:00+5:30

गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची नेहा कुंटेवार ही विद्यार्थीनी ९७ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आली आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७४.९८ टक्के लागला आहे.

Neha first in the district | नेहा जिल्ह्यात पहिली

नेहा जिल्ह्यात पहिली

Next

जिल्ह्याचा निकाल ७४.९८% : प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलची
गडचिरोली : गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची नेहा कुंटेवार ही विद्यार्थीनी ९७ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आली आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७४.९८ टक्के लागला आहे. यामध्ये ७४.२२ टक्के विद्यार्थी तर ७५.७७ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात १८ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. तर एका शाळेचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. चामोर्शी येथील कारमेल अकॅडमीची विद्यार्थीनी पूजा बिधान बेपारी ही ९४.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून दुसरी आली आहे. तर प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलची विद्यार्थीनी भाग्यश्री वाडीघरे ही ९४.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तिसरी आली आहे.
दहावीच्या परीक्षेला जिल्हाभरातून ८ हजार ३०६ विद्यार्थी व ७ हजार ८९५ विद्यार्थीनी असे एकूण १६ हजार २०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ हजार १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६ हजार १६५ विद्यार्थी व ५ हजार ९८२ विद्यार्थीनी आहेत. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७४.२२ टक्के तर विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७५.७७ टक्के एवढे आहे. नेहमीप्रमाणेच याही वर्षाच्या १० वीच्या निकालात विद्यार्थीनींनीच बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे. ७६८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३ हजार १८४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार २०६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ९९८ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत १० वीच्या विद्यार्थ्यांचे प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

Web Title: Neha first in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.