आयुष्याच्या भ्रमंतीत असे थांबणे कधीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:40+5:30
संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दिनक्रम परराज्यातील गाडीलोहार समाजातील लोकांचा आहे.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : बैलगाडीत बिºहाड, हातात काठी, अनवाणी पायांनी अंतर कापत गावाच्या वेशीवर मुक्काम ठोकायचा. तप्त झालेल्या लोखंडाला घनाचे दणादणा घाव घालायचे. शेती व संसारपयोगी लोखंडी साहित्य विकून आपला उदनिर्वाह करायचा, अशाप्रकारची जीवनशैली असलेल्या गाडीलोहार समाजाचे १० ते १५ कुटुंबासमोर कोरोना बंदीने मोठे संकट उभे केले आहे. संपूर्ण आयुष्यात भ्रमंती केली. मात्र अशाप्रकारचे थांबणे एकदाही आले नाही, असा अनुभव गाडीलोहार समाजाच्या लोकांनी सांगितला.
संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दिनक्रम परराज्यातील गाडीलोहार समाजातील लोकांचा आहे. मध्यप्रदेशातील इलामपूर येथील रहिवासी असलेल्या आठ ते दहा कुटुंब फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला कुरखेडा तालुक्याच्या कराडी गावात आले. तलाव परिसरातील या कुटुंबाच्या तात्पुरत्या झोपड्या आहेत. लोखंडापासून कुºहाड, विळे, तावे, नागराची फास व शेतीउपयोगी इतर साहित्य बनविण्याचे काम सदर लोक करतात.
प्रशासकीय मदत पोहोचेना
कराडी गावात मध्यप्रदेशातून स्थलांतरित झालेले ८ ते १० कुटुंब व्यवसायाविना अडचणीत सापडले आहेत. कुठेही भटकायचे नाही, अशा सूचना तलाठ्यांनी या लोकांना दिल्या. पोलीस पाटलांनी कुरखेडा तहसीलदारांना या लोकांच्या परिस्थितीची माहिती दिली. मात्र प्रशासनाकडून त्यांना अजूनपर्यंत कोणतीही मदत करण्यात आली नाही.
अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही
लोखंडी वस्तू बनवून त्या विकून उदनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात आजवर भटकंती केली. भ्रमंती करताकरताच आमच्या अनेक पिढ्या संपल्या. मात्र कोरोनासारख्या संकटाने जी परिस्थिती आणली ती कधीही निर्माण झाली नाही. अशी परिस्थिती आपण कधीही पाहिली नाही, असा अनुभव परराज्यातून आलेल्या गाडीलोहार समाजाच्या बिºहाडातील प्रमुख कैैलालसिंग ठाकूर यांनी लोकमतपुढे व्यक्त केला. या मोठ्या संकटातून परमेश्वर लवकरच सर्वांना मुक्त करेल, अशी पार्थना त्यांनी हात जोडून देवापुढे केली.