अर्धवट नाली साेडून दुसऱ्या जुन्याच नालीवर नव्याने बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:49 AM2021-02-25T04:49:16+5:302021-02-25T04:49:16+5:30
इंदिरानगरातील अर्धवट रस्ता व नाली बांधकाम दुरुस्तीबाबत नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार निवेदने दिली. मात्र नगरपरिषदेने याबाबत केवळ आश्वासन देऊन पूर्णत: ...
इंदिरानगरातील अर्धवट रस्ता व नाली बांधकाम दुरुस्तीबाबत नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार निवेदने दिली. मात्र नगरपरिषदेने याबाबत केवळ आश्वासन देऊन पूर्णत: दुर्लक्ष केले. मात्र आता बाजूच्या जुन्याच नालीवर नव्याने बांधकाम सुरू करुन अर्धवट नाली बांधकामाकडे कानाडोळा केला, असा आराेप करीत चापले ते महाजन यांच्या घरापर्यंत नाली व रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी कौशिक रामटेके, वैभव संगेवार, राजेंद्र कोहळे, मोतिराम महाजन यांच्यासह वाॅर्डातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
माेकळ्या भूखंडावर साचते सांडपाणी
इंदिरानगरातील अर्धवट नाली बांधकामामुळे वाॅर्डातील सांडपाणी व पावसाचे पाणी याेग्यप्रकारे वाहून जात नाही. नाली संपल्यानंतर सांडपाणी रिकाम्या जागेत साचून राहते. रिकाम्या जागेच्या परिसरात अनेक नागरिकांची घरे आहेत. त्यामुळे सांडपाणी तसेच साचलेल्या पाण्याची दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागतो. वाॅर्डातील नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न दुर्गंधीमुळे निर्माण झाला आहे. अर्धवट नालीचे बांधकाम व सांडपाण्याची दुर्गंधी या समस्येकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही नगरपरिषदेने पूर्णत: दुर्लक्ष केले.