नववर्षात गडचिरोलीत येणार नवीन हेलिकॉप्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:37 AM2019-11-22T11:37:17+5:302019-11-22T11:38:36+5:30

पोलीस दलाच्या मालकीचे एच-१४५ हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त हेलिकॉप्टर पोलिसांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी द्यावे लागणारे गृह विभागाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे.

New helicopter to arrive in Gadchiroli in New Year | नववर्षात गडचिरोलीत येणार नवीन हेलिकॉप्टर

नववर्षात गडचिरोलीत येणार नवीन हेलिकॉप्टर

googlenewsNext
ठळक मुद्दे पाच वर्षांपासून ‘पवनहंस’ची सेवाप्रशिक्षण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासाठी गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोली पोलिसांच्या सेवेत असलेल्या पवनहंस कंपनीच्या भाडेतत्वावरील हेलिकॉप्टरची सेवा येत्या डिसेंबरअखेर समाप्त होणार आहे. यासोबतच पोलीस दलाच्या मालकीचे एच-१४५ हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त हेलिकॉप्टर पोलिसांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी द्यावे लागणारे गृह विभागाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे.
नक्षलविरोधी अभियान राबविताना पोलीस दलाचे जवान जखमी झाल्यास त्यांना तातडीने उपचारासाठी हलविता यावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गडचिरोली पोलीस दलासाठी भाडेतत्वावर हेलिकॉप्टर पुरविले होते. २०१५ पासून २०१९ पर्यंतच्या कालावधीत हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी गृह विभागाला ९९ कोटी रुपये पवनहंस कंपनीला द्यावे लागले. दरम्यान राज्य सरकारने पोलीस दलासाठी ७२ कोटी रुपयातून एच-१४५ हे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन ती प्रक्रिया पूर्ण केली.
नवीन हेलिकॉप्टरसाठी तीन पायलटला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत हे हेलिकॉप्टर गडचिरोलीत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: New helicopter to arrive in Gadchiroli in New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.