नवनिर्वाचित सरपंचांनी गाव विकासासाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:33+5:302021-02-27T04:48:33+5:30

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे ...

Newly elected Sarpanch should take initiative for village development | नवनिर्वाचित सरपंचांनी गाव विकासासाठी पुढाकार घ्यावा

नवनिर्वाचित सरपंचांनी गाव विकासासाठी पुढाकार घ्यावा

Next

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

यावेळी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषिकांत पापडकर, युनूस शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष ममता बिश्वास, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जास्वंदा गोंगले, शहर अध्यक्ष ज्योती पेळूकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्यकारी अध्यक्ष मनोज बंडावार, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, उपसभापती प्रगती बंडावार हजर हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित सदस्यांवर विश्वास दाखवून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असून, आता सत्ता स्थापन झाल्यावर सरपंच आणि सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ न देता विकासकामांना गती देऊन ग्रामपंचायतीची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करताना गावविकासासाठी मोठा निधी देण्याची मागणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक सर्व नेत्यांचे असेच मोलाचे मार्गदर्शन नेहमी मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्यात १६ ग्रामपंचायती असून, प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत १४ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले असल्याचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास यांनी प्रास्ताविकातून सांगितले. तालुकाध्यक्ष ममता बिश्वास यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जास्वंदा गोंगले यांनी आभार मानले.

Web Title: Newly elected Sarpanch should take initiative for village development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.