पीओपी मूर्तीला बगल; मातीच्या मूर्ती मिळणार एकाच ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:44+5:302021-09-06T04:40:44+5:30
गडचिराेली : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती पाण्यात विसर्जनामुळे पर्यावरणासंबंधी बरेच दुष्परिणाम आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून ...
गडचिराेली : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती पाण्यात विसर्जनामुळे पर्यावरणासंबंधी बरेच दुष्परिणाम आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून मातीच्याच मूर्तीचा वापर गडचिराेलीत वाढला आहे. यावर्षी कुंभार बांधव व विक्रेत्यांची संघटना गठित झाल्याने मातीच्याच मूर्तीची विक्री केली जाणार आहे. तसेच पीओपीच्या मूर्ती विक्री करणाऱ्यांवर नगर परिषद व पाेलिसांमार्फत कारवाई हाेणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी धानाेरा मार्गावरील एकाच ठिकाणी मातीच्या मूर्ती मिळणार आहेत. गडचिराेली शहरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने कुंभारबांधव व मूर्ती विक्रेत्यांची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या बैठकीत पीओपीला बगल देऊन मातीच्याच मूर्ती तयार करण्याबाबत व पीओपी वापरणाऱ्यावर पालिका व पाेलिसांमार्फत कारवाई करण्याबाबत ठरविण्यात आले हाेते.
बाॅक्स ....
१० हजारांपर्यंत मूर्ती
- गणेशाेत्सवात घरगुती मूर्ती दाेन फूट व सार्वजनिक उत्सवासाठी चार फूट उंचीच्या मूर्तीची मर्यादा आहे. यावर्षी ५०० पासून १० हजार रुपये किमतीच्या मूर्ती मिळणार आहेत. ५०० रुपयांच्या आत मूर्ती मिळणे कठीण असल्याचे एका मूर्तिकाराने सांगितले.
बाॅकस .....
मूर्तीसाठी परिसरातीलच मातीचा वापर
गडचिराेलीत पीओपीच्या मूर्ती बनविल्या जात नाहीत. बरेचजण बाहेरून अशाप्रकारच्या मूर्ती आणून विक्री करतात. परंतु यावर्षी बंद असल्याने अनेकजण परिसरातील मातीचाच वापर करीत आहेत.
शाडूची २० किलाेची एक बाेरी ४०० रुपयांपर्यंत मिळते. ही माती खरेदी करणे कारागिरांना परवडत नाही. त्यामुळे शाडूच्याही मूर्तीचा वापर गडचिराेली येथे केला जात नाही, असे मूर्तिकाराने सांगितले.
बाॅक्स .....
२० हजारावर मूर्तींची विक्री
गडचिराेली शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वैयक्तिक व सार्वजनिक गणेशाेत्सवासाठी गडचिराेली येथून मूर्ती मागविल्या जातात. शहरातील जवळपास ६० विक्रेत्यांकडून मूर्तींची विक्री केली जाणार आहे. यावर्षी २० हजारावर मूर्तींची विक्री हाेणार असल्याचे मूर्ती तयार करणाऱ्या कुंभार समाजबांधवांनी सांगितले.
काेट..
गणेश विसर्जनाच्या दिवशी मूर्तीसाेबतच फुले, हार, तुरे, नैवेद्य, फळे व अन्य निर्माल्य नदी, तलाव, बाेड्या व नाल्यांमध्ये विसर्जित केले जातात. यामुळे जलसाठ्यातील पाणी प्रदूषित हाेऊन जलचर व जलवनस्पतींचे जीवन धाेक्यात येते. तसेच दूषित पाणी पिल्यास जनावरांना विषबाधा हाेऊ शकते.
- उद्धव डांगे, जिल्हाध्यक्ष अंनिस
आमच्या कुटुंबात गणेशाेत्सवात दरवर्षी १०० ते १२५ मूर्ती तयार केल्या जातात. मूर्तीच्या उंचीबाबत शासनाकडून बंधने घातल्याने नियमानुसारच मूर्ती तयार कराव्या लागत आहेत. तसेच सार्वजनिक उत्सवाला प्रतिसाद नसल्याने मूर्तिकारांना व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही. फार लाभ मिळत नाही.
- दिलीप ठाकरे, मूर्तिकार