भाजपचे नऊ पदाधिकारी जिल्हा नियोजन समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:51 PM2019-08-29T23:51:31+5:302019-08-29T23:54:13+5:30

जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली.

Nine BJP office bearers on district planning committee | भाजपचे नऊ पदाधिकारी जिल्हा नियोजन समितीवर

भाजपचे नऊ पदाधिकारी जिल्हा नियोजन समितीवर

Next
ठळक मुद्देशासनाची मान्यता : विशेष निमंत्रित म्हणून केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून भारतीय जनता पार्टीतील पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस राज्याच्या नियोजन विभागाने २८ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता प्रदान केली.
त्या निमंत्रित सदस्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव कोहळे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, तसेच स्वप्नील वरघंटे, रवींद्र ओल्लालवार, रवीकिरण समर्थ, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे), (सुधारणा) अधिनियम कलम ३ चे पोटकलम ३ (४) (फ) मधील तरतुदीनुसार जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या ९ व्यक्तींंची विशेष निमंत्रित म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर नव्याने जिल्हा नियोजन समितीचे गठन होईपर्यंत या सदस्यांचे सदस्यत्व कायम राहणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींना हुलकावणी
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे अजूनही जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कोणीही प्रतिनिधी नाहीत. दरम्यान शासनाने वरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने काही जि.प.सदस्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना डावलून पक्षाच्या लोकांना या समितीवर घेणे म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार असून याचा आपण निषेध करतो, अशी भावना जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी व्यक्त केली.

Web Title: Nine BJP office bearers on district planning committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा