शिकारीच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:17 AM2019-03-30T00:17:47+5:302019-03-30T00:19:20+5:30

जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १२ मधील राखीव जंगलात ९ इसम २८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताच्यादरम्यान संशयास्पद स्थितीत फिरताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले. दरम्यान, संशय बळावल्याने त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

Nine people arrested for hunting efforts | शिकारीच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक

शिकारीच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक

Next
ठळक मुद्देवणवा पेटविण्याची तयारी : महिनाभरापासून धगधगतेय जंगल

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १२ मधील राखीव जंगलात ९ इसम २८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताच्यादरम्यान संशयास्पद स्थितीत फिरताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले. दरम्यान, संशय बळावल्याने त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ सदाशिव तलांडे, संदीप शामराव मडावी, दिलीप मुसली मडावी, बाजीराव सदाशिव तलांडे, अविनाश विठ्ठल मेश्राम, भास्कर मंतू पेंदाम, बापू शंकर वेलादी, विनोद गंगा कोडापे, विकास समस्या आत्राम सर्व रा. मेडपल्ली ता.अहेरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी २८ एप्रिलच्या रात्री वन विभागाचे पथक जंगलात गस्त घालत असताना या नऊ जणांची टोळी राखीव जंगलात प्रवेश करून संशयास्पद स्थितीत आढळून आली. वणवा लावून वन्यजीवांची शिकार करण्याचा त्यांचा उद्देश होता. उन्हाळ्यात जंगलात वणवा पेटत असतो, त्यामुळे कुणालाही संशय येत नाही आणि नेमका याचा फायदा शिकारी घेत असतात. पकडण्यात आलेल्या आरोपींचाही हाच उद्देश होता काय, या दिशेने तपास केला जाणार आहे.
त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, जैवविविधता अधिनियम २००२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई उपवनसंरक्षक सी.आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील, क्षेत्र सहायक योगेश शेरेकर, वनरक्षक डी. एस. जीव्हाणे, आर. एस. मडावी यांनी केली.

Web Title: Nine people arrested for hunting efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.