...येथील मोक्षधामात शवासोबत न्यावा लागतो पाण्याचा ड्रमही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:24 PM2018-09-15T14:24:09+5:302018-09-15T14:27:26+5:30

चामोर्शी जिल्ह्यातील नरेंद्रपूर गावातील नागरिकांना मोक्षधामात मृतदेहासोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही न्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

No water in Cremation ground in Gadchiroli district | ...येथील मोक्षधामात शवासोबत न्यावा लागतो पाण्याचा ड्रमही

...येथील मोक्षधामात शवासोबत न्यावा लागतो पाण्याचा ड्रमही

Next
ठळक मुद्देअंत्यसंस्कार करणे हे ठरते जिकिरीचे कामहातपंप आहे पण पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: चामोर्शी जिल्ह्यातील नरेंद्रपूर गावातील नागरिकांना मोक्षधामात मृतदेहासोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही न्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
या गावातील स्मशान हे दीड किलोमीटर दूर अंतरावर आहे. तेथे जाण्यास रस्ता नाही. खडकाळ वाटेवरून ग्रामस्थांना वाटचाल करावी लागते. एखाद्यावेळी रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करायचे झाल्यास टॉर्चच्या उजेडात अंत्ययात्रा न्यावी लागते. येथील दुसरी मोठी समस्या पाण्याची आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी व तो केल्यानंतर हातपाय धुण्यासाठी येथे पाणी नाही. नावापुरता एक हँडपंप आहे. मात्र त्याला कधीच पाणी नसते. त्यामुळे गावात कुणाचे निधन झाल्यास त्याच्या अंत्ययात्रेसोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही नागरिक घेऊन जातात. या मोक्षधामाला संरक्षण भिंतही नाही. या दूरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. याबाबत गेल्या दहा वर्षांपासून केवळ आश्वासनच मिळते आहे मात्र प्रत्यक्षात काहीच घडत नाही असे गावकऱ्यांचे सांगणे आहे.

नरेंद्रपूर येथील दफनभूमीसाठी शेड मंजूर झाली आहे, लवकरच त्याचे काम सुरू होईल.
ग्रामसेवक टी.डी. चिंतलवार, ग्रामपंचायत सुभाषग्राम.

Web Title: No water in Cremation ground in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार