शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बाेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:37+5:302021-02-05T08:54:37+5:30

बाॅक्स.... जि.प. शाळा १५१२ शिक्षक ४१६२ विद्यार्थी ६३९०१ बाॅक्स... शासकीय याेजनेतील कामे जिल्हा परिषदेच्या ...

Non-academic work on teachers | शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बाेजा

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बाेजा

Next

बाॅक्स....

जि.प. शाळा १५१२

शिक्षक ४१६२

विद्यार्थी ६३९०१

बाॅक्स...

शासकीय याेजनेतील कामे

जिल्हा परिषदेच्या शाळा या सरकारी शाळा आहेत. त्यामुळे शासनाकडून विविध शासकीय याेजनांची अंमलबजावणी, जनजागृती करण्याची कामे जि.प. शिक्षकांवर साेपविले जातात. निवडणुकीपूर्वी मतदार यादी तयार करणे, शासकीय याेजनांसाठीचे विविध प्रकारचे सर्वेक्षण, शाैचालय नाेंदणी आदी कामे करावी लागतात. याशिवाय काेणतीही निवडणूक आली की, लाेकशाही मजबूत करण्याच्या कामासाठी जि.प.शिक्षकांना लावले जाते. लाेकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान व मतमाेजणीची आदी कामे करावे लागते.

बाॅक्स...

१०० वर एक शिक्षकी शाळांची अवस्था वाईट

गडचिराेली जिल्ह्याच्या प्रामुख्याने अहेरी उपविभागात तसेच काेरची तालुक्यात मिळून जवळपास १०३ एक शिक्षकी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमधील शाळा विद्यार्थी गुणवत्तेसाेबतच इतर कामे करण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर येऊन पडते. विविध अशैक्षणिक कामे करताना एकाच शिक्षकाला प्रसंगी शाळा बंद ठेवावी लागते. जिल्ह्यातील एक शिक्षकी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे.

बाॅक्स...

दाेन शिक्षकी शाळांची समस्या

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या जिल्ह्यात जि.प.च्या जवळपास ७०० शाळा आहेत. या शाळांमध्ये एक शिक्षक, मुख्याध्यापक व दुसरा सहायक शिक्षक असताे. अशैक्षणिक कामाचे प्रमाण वाढल्याने दाेन शिक्षकी शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम हाेत आहे.

काेट...

शासननिर्णयानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जि.प.प्राथमिक शिक्षकांवर शासकीय याेजना, निवडणूक व इतर शासकीय कामे साेपविली जातात. शाळा व गुणवत्ता सांभाळून ही कामे करण्याचा प्रयत्न असताे.

- आर.पी.निकम, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.गडचिराेली

Web Title: Non-academic work on teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.