प्रलंबित मागण्यांसाठी पशुधन पर्यवेक्षकांचे असहकार आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:34+5:302021-06-17T04:25:34+5:30
निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. लोमेश लोंढे, डॉ. देवीदास देव्हारे, डॉ. प्रकाश बोकडे, डॉ. नरेंद्र पत्तीवार, डॉ. किशोर पेंदे, ...
निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. लोमेश लोंढे, डॉ. देवीदास देव्हारे, डॉ. प्रकाश बोकडे, डॉ. नरेंद्र पत्तीवार, डॉ. किशोर पेंदे, डॉ. आनंद गोलरवार, डॉ. रवींद्र साखरे, डॉ. आशा कुमरे, डॉ. अर्चना महल्ले, डॉ. रामचंद्र मेश्राम, डॉ. उमेश नैताम, आदी उपस्थित होते.
बाॅक्स
या आहेत प्रमुख मागण्या
ग्रामसेवक, कृषी सहायकाच्या धर्तीवर पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा. पदविका व प्रमाणपत्रधारकांची अर्हता भारतीय पशुवैद्य परिषद कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करणे, पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’ पदोन्नती संदर्भातील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथील प्रलंबित याचिकेसंदर्भात पाठपुरावा करणे, राज्यस्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे त्वरित भरणे, राज्यात बारावीनंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धनविषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विकास अधिकारी गट ‘अ’ सेवाप्रवेश नियम सुधारण्याबाबत, पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून घोषित करून विमासुरक्षा व आवश्यक सुविधा द्याव्यात.
===Photopath===
160621\img-20210616-wa0085.jpg
===Caption===
प्रलंबित मागण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक आचे आंदोलन निवेदनाचे फोटो