गैरआदिवासींच्या प्रश्नावर भाजप लोकप्रतिनिधी गप्प

By admin | Published: August 14, 2015 01:40 AM2015-08-14T01:40:35+5:302015-08-14T01:40:35+5:30

निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील गैरआदिवासींचे प्रश्न आपण सोडवू असे आश्वासन जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी दिले होते.

Non-tribals question BJP's Representative | गैरआदिवासींच्या प्रश्नावर भाजप लोकप्रतिनिधी गप्प

गैरआदिवासींच्या प्रश्नावर भाजप लोकप्रतिनिधी गप्प

Next

उपोषणस्थळाला भेट : उसेंडी यांचा आरोप
गडचिरोली : निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील गैरआदिवासींचे प्रश्न आपण सोडवू असे आश्वासन जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी दिले होते. मात्र निवडणुकीनंतर या प्रश्नांचा त्यांना विसर पडला असून याबाबत ते चुप्पी साधून असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे.
गैरआदिवासींच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने ९ आॅगस्टपासून स्थानिक इंदिरा गांधी चौकात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणस्थळाला डॉ. उसेंडी यांनी गुरूवारी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठींबा दर्शविला. त्याचबरोबर विद्यमान आमदार व खासदारांच्या धोरणावर टीकासुध्दा केली. आमदार व राज्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मंत्रिमंडळात चर्चेसाठी आणावा. त्याचबरोबर अधिसूचना रद्द करण्यासाठी आदिवासी सल्लागार समितीच्या मार्फतीने राज्यपालांकडे मागणी लावून धरल्यास अधिसूचनेत बदल शक्य असल्याचे सांगितले. आमदार होळी यांचे वक्तव्य लोकभावना भडकावणारे असल्याचीही टीका केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव हसन गिलानी, पंकज गुड्डेवार, प्रभाकर वासेकर, नरेंद्र भरडकर, टी. डी. सोनटक्के, पंडीत पुडके, अमिता लोणारकर, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, संतोष आत्राम, डी. डी. सोनटक्के, पी. टी. मसराम, समशेर पठाण, प्रदीप महाजन, दिवाकर मिसार, ढिवरू मसराम, बालू मडावी, संजय घोटेकर, नंदू वाईलकर, सतिश विधाते, महेंद्र ब्राह्मवाडे, रजनिकांत मोटघरे, अमोल भडांगे, नितेश राठोड, प्रतिक बारसिंगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Non-tribals question BJP's Representative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.