उच्च धान केंद्रांवर नव्हे, तर व्यापाऱ्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 05:00 AM2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:00:37+5:30
गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचा संसर्ग कायम असल्याने शासनाने निधी वाटपात हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम कृषी विभागाच्या याेजनांवरही झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे चुकारे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळाले हाेते. तर बाेनसची रक्कम मे व जून महिन्यात मिळाली हाेती. यावर्षी शासनाने ७०० रुपये बाेनस जाहीर केला नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावरील धान विक्रीसाठी प्रती क्विंटल ७०० रुपये बाेनस शेतकऱ्यांना दिला जात हाेता. परंतु यावर्षी शेतकऱ्यांना ७०० रुपये बाेनस मिळेल, याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी केवळ साधारण प्रतीचा जाड धान आधारभूत किमतीत विक्री करीत आहेत. मात्र उच्च प्रतीचा धान खासगी व्यापाऱ्यांकडे आधारभूत किमतीपेक्षा अधिक किमतीत विक्री केला जात आहे.
गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचा संसर्ग कायम असल्याने शासनाने निधी वाटपात हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम कृषी विभागाच्या याेजनांवरही झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे चुकारे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळाले हाेते. तर बाेनसची रक्कम मे व जून महिन्यात मिळाली हाेती. यावर्षी शासनाने ७०० रुपये बाेनस जाहीर केला नाही. परंतु हमीभाव केंद्रांवर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत थेट पैसा जमा केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जाहीर केले हाेते. परंतु शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपयेच बाेनस मिळणार की, एकरी अथवा हेक्टरी रुपये बाेनसच्या रुपात जमा केले जातील. याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. त्यामुळे शेतकरी उच्च प्रतीच्या धानाची आधारभूत खरेदी केंद्रांवर विक्री न करता या धान खासगी व्यापाऱ्यांना २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री करीत आहेत. तसेच मध्यम प्रतीचाही धान हमीभावापेक्षा २०० ते ३०० रुपये अधिक दराने विक्री हाेत आहे.
सातबारा जमा करणे बंद
गेल्या दाेन वर्षात बाेनसच्या लाेभापाई अनेक खासगी व्यापारी तसेच काही शेतकरी इतरांकडून सातबारे जमा करून त्यांच्याकडील उच्चप्रतीचा धान आपण ठेवत असत व त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या नावावर थेट आधारभूत केंद्रांवर साधारण जाड धानाची विक्री करीत असत. परंतु यावर्षी बाेनसबाबत शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांकडून सातबारे जमा करणे बंद झाले आहे.
असे वापरायचे फंडे
जिल्ह्यातील बहुतांश व्यापारी छत्तीसगड राज्यासह सीमावर्ती भागातून जाड धान आणून आधारभूत केंद्रांवर विक्री करायचे. तसेच शेतकऱ्यांकडून सातबारा घेऊन त्यांच्याकडील उच्च प्रतीचा धान स्वत: खुल्या बाजारपेठेत अधिक किमतीत विकायचे व संबंधित शेतकऱ्याच्या नावाने बाहेरून बाेलविलेला जाड धान विक्री केला जायचा. याशिवाय अनेक मध्यस्थी संस्थाही बाेनसच्या हव्यासाने बाहेरून धान आणून केंद्रांवर विक्री करण्याचे काम करीत हाेत्या.