स्मार्ट सिटी नको, गावाचा विकास हवा

By admin | Published: October 20, 2016 02:28 AM2016-10-20T02:28:13+5:302016-10-20T02:28:13+5:30

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे.

Not a smart city, the development of the village is windy | स्मार्ट सिटी नको, गावाचा विकास हवा

स्मार्ट सिटी नको, गावाचा विकास हवा

Next

सुरेश भोयर यांचे प्रतिपादन : कोरचीत काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा
कोरची : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे. मात्र सदर स्मार्ट सिटी संकल्पनेचा ग्रामीण भागात काहीही फायदा नाही. त्यामुळे गावाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर यांनी केले.
कोरची येथील राजीव भवनात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा सोमवारी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा प्रभारी डॉ. योगेश भगत, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी प्रदेश सचिव हसन गिलानी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, कुरखेडाचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती प्रभाकर तुलावी, माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, नगरसेवक मनोज अग्रवाल, दिलीप घोडाम, कामठी पालिकेचे सभापती प्रभाकर मोहल, हकीम शेख, प्रेमिला काटेंगे आदी उपस्थित होते.
भाजपच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी बाहेर देशाच्या बँकेत असलेला काळा पैसा भारतात आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकण्यात येईल, तसेच पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करू, असे प्रलोभन दिले होते. यावर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपच्या नेत्यांना सत्तेत बसण्याची संधी दिली. मात्र अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पदरी काहीच पडले नाही, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामलाल मडावी, संचालन मुलानसिंग कोडाप यांनी केले तर आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.

अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोरची तालुक्यातील इतर राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये कविता कार्तिक रक्शा, मेहतरू ताराम, सुरेश डवास, ढोलदार निशाद, कांताराम जमकामन, भिमराव कऱ्हाडे, नंदू भेळी, वामन नंदेश्वर, श्रावण गगाकायूर, मधुकर शेंडे, टेमलाल देवांगन, धनसिंग घावडे, बिजलाल बगपुरिया, यादव खोब्रागडे, हमीद पठाण, गोपाल मोहुर्ले, रमेश गोटा, बालिराम मडावी, धालदास नैताम, सोमाजी कोवासे, छगन चौधरी, सागर नेवारे, सुरेश सावाली, महेश नरोटे यांचा समावेश आहे.

Web Title: Not a smart city, the development of the village is windy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.