प्लास्टिक बंदीसाठी व्यावसायिकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:00 AM2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील व्यावसायिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याबाबतचे नोटीस मुख्याधिकारी विशाल पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील व्यावसायिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याबाबतचे नोटीस मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी दिले आहेत.
महाराष्टÑ शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जाहीर केली आहे. याअगोदरही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर महाराष्टÑ शासनाने प्रतिबंध घातला आहे. तरीही प्लास्टिकचा वापर दुकानदार तसेच सामान्य नागरिक करतात. प्लास्टिक ही पर्यावरणाला अतिशय घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर व्यावसायिकांनी करू नये, याबाबतचे नोटीस दुकानदारांना पाठविले आहे.
प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करीत काही दुकानदारांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आल्या. सिरोंचा नगर पंचायतीने यापूर्वीही प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी झाला होता. काही दिवसांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे.
जोपर्यंत प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम नागरिकांना कळणार नाही, तोपर्यंत प्लास्टिकचा वापर बंद होणार नाही. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृतीची मोहीम राबविल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.