आता २०० लाेकांच्या उपस्थितीत हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:57+5:302021-08-15T04:37:57+5:30
काेराेनाच्या कालावधीत लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लाेकांच्या मर्यादेवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या जाेडप्याला धूमधडाक्यात लग्न समारंभ करायची इच्छा ...
काेराेनाच्या कालावधीत लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लाेकांच्या मर्यादेवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या जाेडप्याला धूमधडाक्यात लग्न समारंभ करायची इच्छा हाेती त्यांनी लग्नसमारंभ लांबणीवर टाकला आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने उपस्थितांची मर्यादा शासनाने अजूनही उठविली नाही. मात्र थाेडा दिलासा देताना उपस्थितीची मर्यादा वाढविली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १२ ऑगस्ट राेजी नवीन आदेश काढले आहेत. खुले प्रांगण / लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय/हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती राहणार आहे. लाेकांच्या उपस्थितीची मर्यादा वाढविली असल्याने विवाह साेहळे आटाेपण्याची संधी साधून आली आहे.
बाॅक्स
लग्नाच्या तारखा
१८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ ऑगस्ट राेजी विवाह मुहूर्त आहेत.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
शहरातील प्रमुख मंगलकार्यालये-८
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
काेट
लग्न करण्यासाठी यापूर्वी केवळ ५० लाेकांचीच मर्यादा हाेती. त्यामुळे बहुतांश विवाह घरीच आटाेपले जात हाेते. आता ही मर्यादा वाढवून २०० केली आहे. त्यामुळे नक्कीच मंगलकार्यालयांमध्ये लग्न करण्याचे प्रमाण वाढेल. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे लग्न घरी करणे शक्य नाही. मंगल कार्यालयात सर्व सुविधा राहतात. तसेच दरात काही प्रमाणात सूटही दिली जाते.
-सुनील पाेरेड्डीवार, मंगलकार्यालय मालक