आता माेबाइल ॲप लावणार वाहनांच्या अपघाताला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:09+5:302021-07-04T04:25:09+5:30
वाहनांची संख्या वाढल्यापासून देशात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरदिवशी हजाराे नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू हाेते. त्यामुळे अपघात ही ...
वाहनांची संख्या वाढल्यापासून देशात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरदिवशी हजाराे नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू हाेते. त्यामुळे अपघात ही देशासमाेरील सर्वांत माेठी समस्या बनली आहे. अपघातांचे प्रमाण राेखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे शासनाने इंटिग्रेटेेड राेड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरडीए) हे ॲप विकसित केले आहे. जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे व इतर बाबी पूर्ण करण्यात आल्या. मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष ॲपवर नाेंदी घेण्यास सुरुवात झाली.
बाॅॅक्स
असे चालते काम
- प्रत्येक अपघातासंबंधी सविस्तर माहिती या ॲपमध्ये भरली जाते. यामध्ये वाहनाचा प्रकार, अपघात काेठे घडला, केव्हा घडला, अपघाताचे कारण काय आदींची नाेंद केली जाणार आहे.
- ही माहिती जिल्हा स्तरावर तसेच आयआयटी चेन्नई येथे पाठविली जाणार आहे. या माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे.
- यामुळे अपघात प्रवणस्थळ, अपघाताचे नेमके कारण काय, हे शाेधण्यास मदत हाेईल.
बाॅक्स
आतापर्यंत ८६ अपघातांची नाेंद
मार्च महिन्यापासून अपघातांची ॲपवर प्रत्यक्ष नाेंद घेण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जिल्हाभरातील ८६ अपघातांची नाेंद या ॲपवर झाली आहे.
बाॅक्स
५७ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
या प्रकल्पाच्या जिल्हा नाेडल अधिकारी म्हणून एपीआय पूनम गाेरे काम करीत आहेत. सध्या १९ पाेलीस स्टेशनमध्ये हे ॲप वापरले जात आहे. या ॲपवर अपघाताची नाेंद करण्यासाठी प्रत्येक पाेलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला नाेडल अधिकारी नेमण्यात आले आहे. त्याला सहकार्य करण्यासाठी दाेन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रस्ते अपघात
२०१९
अपघात - २०७
जखमी - २९३
मृत्यू - १३२
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
२०२०
अपघात - २३१
जखमी - २४२
मृत्यू - १४२
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
२०२१
अपघात - ९९
जखमी - ११६
मृत्यू - ५९
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
२०१८ मधील अपघात
२६२