आता उरले केवळ १५१ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:12+5:302020-12-30T04:45:12+5:30
गडचिराेली : जिल्ह्यात नव्याने २० काेराेनाबाधित आढळून आले आहेत. तर ४२ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी साेडण्यात ...
गडचिराेली : जिल्ह्यात नव्याने २० काेराेनाबाधित आढळून आले आहेत. तर ४२ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी साेडण्यात आले आहे.एकूण बाधितांची संख्या ८ हजार ९५६ झाली आहे. त्यापैकी ८ हजार ७०४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सक्रीय काेराेना रूग्णांचे प्रमाण आता केवळ १५१ आहे. एकूण १०१ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्पलेक्स १, पंचवटी नगर १, गोंडवाना विद्यापीठ
जवळ ४, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये कोडसेपल्ली १, नागेपल्ली १, कसरपल्ली १, आरमोरी तालुक्यातील
बाधितांमध्ये कीटाळी १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये गणपूर १, आष्टी ३, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये रांगी १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये कसनसूर १, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये कोटगुल १, मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली पीएचसी १ व देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा १, कोरेगाव १ यांचा समावेश आहे.